Join us  

सर्वेक्षण! इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षातच 70 % विद्यार्थ्यांना जडते 'दारु अन् सिगारेटचे व्यसन'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 8:31 PM

इंजिनिअरींगला प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी दारू आणि सिगारेटचे शौकीन होतात. तर, काही विद्यार्थ्यांना दारु आणि सिगारेटचे व्यसनच जडते, असे नेहमीच आपण ऐकत असतो. मात्र, एका सर्वेक्षणातून ही बाब खरी ठरली आहे.

मुंबई - इंजिनिअरींगला प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी दारू आणि सिगारेटचे शौकीन होतात. तर, काही विद्यार्थ्यांना दारु आणि सिगारेटचे व्यसनच जडते, असे नेहमीच आपण ऐकत असतो. मात्र, एका सर्वेक्षणातून ही बाब खरी ठरली आहे. मुंबई आयआयटीमधून यंदाच्या वर्षी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेताच 70% विद्यार्थ्यांना सिगारेट आणि दारुचे व्यसन लागत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मुंबई आयआयटीमधून यंदाच्या वर्षी 192 विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडले आहेत. या विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण केल्यानंतर, 5 पैकी 4 विद्यार्थ्यांना तंबाखू आणि सिगारेटचे व्यसन पहिल्या वर्षातच लागते, असे सिद्ध झाले आहे. तर 10 पैकी 7 विद्यार्थ्यांना अल्कोहल म्हणजेच दारुचे व्यसन जडत असल्याचे सिद्ध झाले आहे. आयआयटी-ब सिनियर 2018 च्या सर्वेक्षणातून ही बाब सिद्ध झाली आहे. शुक्रवारी रात्री हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी कसे जगतात. विद्यार्थ्यांचा अभ्यास, मुल्ये आणि भविष्यातील योजना यांसाठी हा सर्व्हे करण्यात आला होता. 

इंजिनिअरींगसाठी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थांना सिगारेट आणि दारुचे व्यसन जडण्याची अनेक कारणेही समोर आली आहे. त्यामध्ये, घरापासून दूर असल्याने, मित्रांच्या सहवासाने, सहकार्यांच्या दबावाने ही प्रमुख कारणे असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे केवळ 17.8 टक्के विद्यार्थीच कॉलेजमध्ये अकॅडमिक अभ्यासात सातत्य आणि काळजीवाहू असतात. या सर्वेक्षणात केवळ 29.8 टक्केच विद्यार्थी त्यांच्या सभ्येतत आनंदी असल्याचे समोर आले आहे. तसेच या विद्यार्थ्यांपैकी 13.5 टक्के विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असून ते समुपदेशन करत असल्याचेही या सर्वेक्षणात उघड झाले आहे.  दरम्यान, आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक शहरी भागांतील तरुणांचा समावेश आहे. त्यामध्ये, 66 टक्के विद्यार्थी महानगरीय भागातून, तर 9.4 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातून आले आहेत. तसेच 24.5 टक्के विद्यार्थी हे शहरांतून आलेले आहेत.  

टॅग्स :आयआयटी मुंबईमुंबईधूम्रपानदारूबंदी