सनी लिओनीच्या पतीने शेअर केला फॅमिलीचा ‘बोल्ड’ फोटो, संतापले लोक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 11:35 IST2018-06-18T11:35:18+5:302018-06-18T11:35:18+5:30
फादर्स डेच्या निमित्ताने डेनिअलने पुन्हा एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

सनी लिओनीच्या पतीने शेअर केला फॅमिलीचा ‘बोल्ड’ फोटो, संतापले लोक!!
मुंबई - कालपरवाचं सनी लिओनीचा पती डेनिअल वेबर याने आपल्या दोन्ही जुळ्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या क्यूट फोटोने सगळ्यांची मने जिंकली होती. यानंतर काल फादर्स डेच्या निमित्ताने डेनिअलने पुन्हा एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटोही लोकांना आवडेल, असा त्याचा अंदाज होता. पण झाले भलतेच. हा फोटो लोकांनी पाहिला आणि लोक भडकले. यानंतर सनी आणि डेनिअल दोघेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत. अर्थात काही लोक डेनिअल आणि सनीच्यावतीने या ट्रोलर्सशी दोन हात करण्यासाठी मैदानातही उतरले.
आता डेनिअलने शेअर केलेल्या फोटोत असे काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल तर, या फोटोत सनी आणि निशा या दोघीही न्यूड आहेत. त्यामुळेच या फोटोवरून वाद निर्माण झाला आहे. सनी व डेनिअल या दोघांनी गतवर्षी एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव त्यांनी निशा असे ठेवलेय़ यानंतर सनी व डेनिअल यांनी सरोगसीद्वारे आणखी जुळ्या मुलांना जन्म दिला़ त्यामुळे या कपलला आता एकूण तीन मुले आहेत़ या तिन्ही मुलांसोबतचे फोटो हे कपल वेळोवेळी शेअर करत असते. लग्नापूर्वी डेनियल आणि सनीने एकमेकांना बरेच वर्ष डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा सनी डेनियलला एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये भेटली होती. ज्यामध्ये डेनियलने सनीला इम्प्रेस करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु सनीने डेनियलला अजिबात भाव दिला नाही. तिच्यासाठी डेनियल केवळ एक केसोनोवा होता.
हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सनीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आतापर्यंत जेवढे हॉट सीन दिले आहेत, ते सर्व पती डेनियलसोबत दिले आहेत. डेनियल अशाप्रकारचे सीन देण्यासाठी चित्रपटात बॉडी डबलचे काम करतो. डेनियल एखाद्या ड्रीम पतीप्रमाणे सनीला आपल्या हाताने जेवण बनवून भरवीत असतो. सनी लिओन आणि डेनियल वेबर केवळ चांगले लाइफ पार्टनर नाहीत तर चांगले बिझनेस पार्टनरही आहेत. सनीने पती डेनियलसोबत २००९ मध्ये सनलस्ट पिक्चर्स नावाचे एक प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे.