Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाल्याच्या चर्चेवर सुनील राऊत म्हणतात, ती तर अफवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 21:12 IST

मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे उद्धवसाहेबांचा शिवसेनेचा आदेश पाळणे हे माझे पहिले कर्तव्य...

 मुंबई - शिवसेना हे माझ्यासाठी माझं घर आहे. त्यामुळे मंत्रिपद किंवा कुठलेही लाभाचं पद हे माझ्यासाठी दुय्यम आहे. माझी प्राथमिकता ही पदापेक्षा आयुष्यभर शिवसेना पक्षाची आणि पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करणे हीच आहे आणि ती मी आयुष्यभर करत राहीन. मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज आहे किंवा मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे ही अफवा सध्या पसरवली जात आहे.

मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे उद्धवसाहेबांचा शिवसेनेचा आदेश पाळणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या शिवसेना पक्षाला त्रास होईल, तोटा होईल किंवा माझ्या एखाद्या कृतीमुळे पक्षाअंतर्गत अनागोंदी माजेल, विरोधकांचे फावेल असं कोणतेही पाऊल मी उचलणार नाही. मंत्रीपद मिळो अगर ना मिळो , मी माझ्या विक्रोळी मतदारसंघात तितक्याच ताकदीने पक्षाचे काम करत राहीन.

टॅग्स :सुनील राऊतशिवसेनामहाराष्ट्र सरकार