मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी सुनील भिरूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 00:11 IST2018-09-08T00:11:36+5:302018-09-08T00:11:51+5:30

मुंबई विद्यापीठाने कुलसचिवपदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार सोपविण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक सुनील भिरूड यांची निवड केली आहे.

Sunil Bhirud as the Registrar in charge of Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी सुनील भिरूड

मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी सुनील भिरूड

मुंबई : मुंबई विद्यापीठाने कुलसचिवपदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार सोपविण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा येथील संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक सुनील भिरूड यांची निवड केली आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी शुक्रवारी त्यांना पदभार दिला. त्यांच्याकडे हे पद पुढील सहा महिन्यांसाठी किंवा पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत किंवा सरळसेवेने पद भरेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत असेल.
प्रा. भिरूड यांनी अभियांत्रिकी शाखेत एम.ई., पीएच.डी. केली असून, त्यांना २९ वर्षांचा शैक्षणिक आणि ५ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहे.

Web Title: Sunil Bhirud as the Registrar in charge of Mumbai University