Sushma Andhare, Sunetra Pawar: फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांचा तीन दिवसांचा भारत दौरा सोमवारपासून सुरू झाला. मुंबईत पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा असून अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालय, मलबार हिल आणि लोक भवनच्या परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर फलक लावले आहेत. पदपथांवरही फलक लावले आहेत. सार्वजानिक ठिकाणी, रस्ते, चौकांत फलक लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही हे फलक लावण्यात आल्याने विरोधकांनी यावर टीका केली. त्यातच उद्धवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी या फलकावरून आणखी एक सवाल केला आहे.
सुषमा अंंधारे यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला असून, त्यासोबत एक सवाल केला आहे. "मुंबईमध्ये आज फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख येणार या निमित्ताने जोरदार बॅनरबाजी केली आहे. पण आजवर मुख्यमंत्री आणि त्यानंतर थोड्या कमी मात्र सारख्या उंचीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असायचे. मात्र आज लावलेल्या बॅनरमध्ये नव्याने उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा वहिनी यांचा फोटो आकाराने छोटा का लावला गेला? हे बॅनर शाहसेनेने लावले असल्याचे कळते. शाहसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनेत्रा वहिनींचा फोटो लहान करून नेमके काय दाखवायचे आहे. महिला म्हणून श्रीमती पवार यांचे अवमूल्यन करायचे आहे की पदसोपांपरंपरेमध्ये मी दुसरा आणि पवार तिसऱ्या असं सांगायचं आहे...?" असा खोचक आणि तिखट सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन हे सोमवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांची पत्नी ब्रिगिट यादेखील दौऱ्यावर आले. त्यांच्या स्वागताचे फलकांनी रस्ते, चौक भरले. विमानतळ ते मंत्रालय, मंत्रालय ते लोकभवन, मंत्रालय ते ताज हॉटेल मार्गावर मोठमोठे फलक लावले. पदपथावरही फलक लावले आहेत. फलकांवर मॅक्रॉनसह पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आदींचे फोटो लागले. याबाबत तक्रार करताना विरोधकांनी फलकांमुळे पदचाऱ्यांना चालण्यास अडथळा होत असल्याचा दावा केला होता आणि टीका केली होती.
सुनेत्रा पवारांचे फोटो लहान करून नेमके काय दाखवायचे आहे.
Web Summary : Sushma Andhare questioned why Sunetra Pawar's photo was smaller on banners welcoming France's President Macron. She speculated if it was to demean Pawar or show hierarchy, amidst criticism over illegal banners in Mumbai.
Web Summary : सुषमा अंधारे ने फ्रांस के राष्ट्रपति मैक्रों के स्वागत बैनरों पर सुनेत्रा पवार की छोटी तस्वीर पर सवाल उठाया। उन्होंने पूछा कि क्या यह पवार को नीचा दिखाने या पदक्रम दिखाने के लिए था। मुंबई में अवैध बैनरों की आलोचना हो रही है।