Join us

सुजित पाटकरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 06:13 IST

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला.

मुंबई : कोरोनाच्या काळात दोन जम्बो कोरोना केंद्रातील कामांत अनियमितता  केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला.

‘आरोपी व त्याच्या साथीदारांनी आपण मानवी जीवन वाचविण्यासाठी पुढे आल्याचे दाखविले असले तरी त्यांनी गुन्हेगारी कट रचला होता. डॉक्टरांशी हातमिळवणी करून खोटे कर्मचारी दाखवून पालिकेला लुबाडण्याच्या उद्देशाने त्यांनी कट  रचला आणि लोकांच्या जीवाशी खेळले,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

टॅग्स :न्यायालयधोकेबाजीमुंबईपोलिस