महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:04 IST2019-05-26T06:04:12+5:302019-05-26T06:04:18+5:30
स्वत:वर गोळी झाडत मोहन ऐकणार (२२) या महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाने आयुष्य संपविले.

महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाची आत्महत्या
मुंबई : स्वत:वर गोळी झाडत मोहन ऐकणार (२२) या महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाने आयुष्य संपविले. शनिवारी संध्याकाळी विलेपार्ले परिसरात हा प्रकार घडला असून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एअरपोर्ट कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ते कर्तव्यावर होते. त्यांनी स्वत: जवळ असलेल्या बारा बोअर बंदुकीने स्वत:च्या कानशिलावर गोळी झाडली. त्यांना तातडीने त्यांना कूपर रुग्णालयात उपचारास दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडलेली नाही.