Join us  

सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून आत्महत्या; रेल्वे कर्मचाऱ्याने माटुंगा स्थानकात रेल्वेखाली घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 7:20 AM

डाबी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून दादर रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह तीनजणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मुंबई : सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून सोमवारी दुपारी साडेतीन वाजता जगदीश डाबी (वय ३६) या रेल्वे कर्मचाऱ्याने माटुंगा स्थानकात रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. डाबी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून दादर रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह तीनजणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.डाबी हे पत्नी आणि दोन मुलांसह डोंबिवली पूर्व भागातील नांदीवली येथे राहत होते. ते माटुंगा वर्कशॉपमध्ये कामाला होते. त्यांनी फेसबुकवर अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती. महिला ऑनलाइन सेक्सच्या नावाखाली त्यांना अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत होती. भीतीमुळे त्यांनी तिच्या बँक खात्यावर वेळोवेळी दोन लाख रुपये पाठवले होते. मात्र, त्यानंतरही त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरूच होती.

टॅग्स :गुन्हेगारीमृत्यूमुंबई