Join us

मुंबईच्या रस्त्यावर खड्डा नव्हे तर भगदाड, प्रवास न करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 14:48 IST

सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या सूचना गाडी चालकांना दिल्या जात आहेत.

मुंबई: मुंबईच्या मालवणी येथून जाणा-या मुख्य रस्त्यावर अचानक मोठे भगदाड पडले आहे. मालवणीत गेट क्रमांक एक जवळचा मुख्य रस्ता अचानक खचला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या सूचना गाडी चालकांना दिल्या जात आहेत.

आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मालवणीत गेट क्रमांक एक जवळचा मुख्य रस्ता अचानक खचला आहे. आधीच वाहतुकीची प्रचंड कोंडी असणाऱ्या या रस्त्यावर हा खड्डा पडल्याने स्थानिकांना त्याचा प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. हा विभाग मुंबई महापालिकेच्या पी उत्तर विभागात मोडतो. भगदाड पडल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता बॅरिकेड लावण्यात आले आहेत. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या सूचना गाडी चालकांना दिल्या जात आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)

टॅग्स :खड्डेमुंबई