'अशी माणसं बलात्कारी'; कुत्र्याला केलेल्या मारहाणीच्या व्हिडीओवर रवीनाचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:36 IST2018-04-03T13:36:59+5:302018-04-03T13:36:59+5:30
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन तशी फारशी चर्चेत नसते. परंतु सध्या तिनं एक व्हिडीओ ट्विटरवर रिट्विट केल्यानं ती चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये एक मद्यधुंद व्यक्ती गाडीच्या स्टेअरिंगवर कुत्र्याला बेदम मारहाण करताना पाहायला मिळतेय.

'अशी माणसं बलात्कारी'; कुत्र्याला केलेल्या मारहाणीच्या व्हिडीओवर रवीनाचा संताप
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन तशी फारशी चर्चेत नसते. परंतु सध्या तिनं एक व्हिडीओ ट्विटरवर रिट्विट केल्यानं ती चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये एक मद्यधुंद व्यक्ती गाडीच्या स्टेअरिंगवर कुत्र्याला बेदम मारहाण करताना पाहायला मिळतेय. व्हिडीओ पाहिल्यास तुमच्याही रागाला पारावार उरणार नाही.
अभिनेत्री रवीना टंडन हिनं व्हिडीओ पाहताच रिट्विट केला आहे. व्हिडीओ रिट्विट करत ती म्हणाली, माणूस असल्याचं हे अत्यंत लाजिरवाणं आणि गलिच्छ उदाहरण आहे. देव करो आणि त्याला याच जन्मात या पापासाठी कठोरातील कठोर शिक्षा मिळो. अशी माणसेच पुढे जाऊन गुन्हेगार प्रवृत्तीची होतात. पत्नीला मारहाण करतात आणि खुनी बनतात. रवीनाच्या एका चाहत्यानंही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
This Dirty horrible excuse of a human being . Lowlife ! Hope to god gets punished in the strongest way possible in his life ! These kind of people end up being criminals rapists wife beaters and murderers https://t.co/BbR2sjSQPS
— Raveena Tandon (@TandonRaveena) April 2, 2018
हा माणूस नव्हे, तर राक्षस आहे. याच्यापेक्षा तर जनावरं चांगली असतात. हा व्हिडीओ कोणत्या तरी ओबे नामक व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कुत्र्याला मारहाण करत असलेला तो व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला असून, त्या नराधम माणसाचा सध्या शोध सुरू आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे.