सुतारकाम करणाऱ्या २८ वर्षांच्या आसामी तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:55 IST2018-11-02T00:54:52+5:302018-11-02T00:55:29+5:30

करवतीने कापला होता पंजा; ‘प्लॅस्टिक सर्जरी’द्वारे पुन्हा जोडले अवयव

Successful surgery for the 28 year old Assamese youth, who works with a carpenter | सुतारकाम करणाऱ्या २८ वर्षांच्या आसामी तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

सुतारकाम करणाऱ्या २८ वर्षांच्या आसामी तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : मुंबईत उदरनिर्वाहासाठी सुतारकाम करणाºया आसाम येथील २८ वर्षीय तरुणाच्या पायाच्या अंगठ्यावर महापालिकेच्या कूपर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली़ करवतीने कापलेला उजव्या पायाचा अंगठा प्लॅस्टिक सर्जरीद्वारे डॉक्टरांनी जोडला आहे.

सुतारकाम करत असताना त्याच्या उजव्या पायाचा पंजा करवतीने कापला गेला. या अपघातादरम्यान पाय व पंजा वेगळे होऊन केवळ त्वचेच्या साहाय्याने तसेच जोडलेले होते. या प्रकारच्या अपघातादरम्यान पाय, हात यासारखा एखादा बाह्य अवयव तुटला असल्यास त्याचा रक्तप्रवाह थांबतो व अवयव निकामी होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू होते. अशाच परिस्थिती त्या तरुणावर ओढावली होती़ मात्र त्याला त्वरित कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याच्यावर सलग सहा तासांची जटिल शस्त्रक्रिया केली. महिन्याभराच्या उपचारानंतर तरुणाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

याविषयी रुग्णालयाच्या प्लॅस्टिक सर्जन विभागाचे डॉ. नितीन घाग यांनी सांगितले की, या प्रकारची सुघटन शल्य चिकित्सा पहिल्यांदाच रुग्णालयात करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान कापल्या गेलेल्या रक्तवाहिन्यांचा दुसरा भाग शोधून तो जोडणे, त्वचा जोडणे इ. बाबी करण्यात आल्या. अपघातादरम्यान तरुणाच्या उजव्या पायाच्या घोट्याच्या हाडाचा भुगा झालेला होता. या ठिकाणी शस्त्रक्रियेदरम्यान धातूची पर्यायी पट्टी बसविण्यात आली. शस्त्रक्रिया करणाºया चमूमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार ग्वालानी, अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. एच.जी. आगरकर, डॉ. अमित जोशी, प्लॅस्टिक सर्जन अनिष राऊत यांचा समावेश होता.

‘तो’ स्वत:च्या पायावर उभा राहणार
लवकरच हा तरुण स्वत:च्या पायांवर पुन्हा एकदा उभा राहील, असा विश्वास कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Successful surgery for the 28 year old Assamese youth, who works with a carpenter