मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. बलसरा यांनी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
शरद पवार यांना ३० मार्चला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर
छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ७ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यानंतर १५ दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यामुळे शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}