Join us

मुंबई शहराच्या तुलनेत उपनगर ‘उष्ण’; थंडी होतेय गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 02:07 IST

मुंबई आणि उपनगराच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. थंडी गायब होत आहे.

मुंबई : मुंबई आणि उपनगराच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. थंडी गायब होत आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरातील ठिकठिकाणचे तापमान अधिक नोंदविण्यात येत असून, मुंबई शहरापेक्षा उपनगर अधिक ‘उष्ण’ असल्याची नोंद हवामान खात्याने गुरुवारी केली आहे.उपनगरातील पवई आणि भांडुप ही दोन ठिकाणे वगळली तर उर्वरित ठिकाणांचे किमान तापमान २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले.मुंबईचे किमान तापमान गुरुवारी १९.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे १३.३ अंश होते. १५, १६ फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १७ व १८ फेब्रुवारीला राज्यात हवामान कोरडे राहील.दरम्यान, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.विदर्भात आज गारपीटविदर्भात शुक्रवार, १५ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होईल. तर, शुक्रवारसह शनिवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २१ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

टॅग्स :हवामान