मुंबई - देशातील अनेक महापुरुषांचे चरित्रपट 70 मिमिच्या पडद्यावर झळकवणाऱ्या सुबोध भावेला देशातील मोठ्या नेत्याची भूमिका साकारयची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात शरद पवारांची भूमिका साकारायची असल्याची इच्छा सुबोध भावेने व्यक्त केलीय.
हिंदी चित्रपटातील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली होती. ठाकरे चित्रपटात सिद्दीकी यांचा लुक हुबेहुब बाळासाहेब ठाकरेंसारखाच दिसून येत होता. या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती, तर कौतुकही करण्यात आले होते. आता, बाळासाहेब ठाकरेंनंतर महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या नेत्यावर चित्रपट बनविण्यात येईल, असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अभिनेता सुबोध भावेने शरद पवारांची भूमिका साकारण्यास उत्सुक असल्याचं म्हटलंय.