‘सुभाष देशमुखांना वाचविण्यासाठी आयुक्तांची बदली’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 05:33 IST2018-10-24T05:33:02+5:302018-10-24T05:33:19+5:30
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेने बनावट कागदपत्रांद्वारे निधी लाटल्याचे स्पष्ट झाले.

‘सुभाष देशमुखांना वाचविण्यासाठी आयुक्तांची बदली’
मुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेने बनावट कागदपत्रांद्वारे निधी लाटल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली केल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी केला.
दूध भुकटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून देशमुखांच्या लोकमंगल संस्थेला २४ कोटी ८१ लाखांचा निधी मंजूर झाला. त्यातील ५ कोटी संस्थेच्या खात्यातही जमा झाले. मात्र, लोकमंगलने सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. हा भ्रष्टाचार उघड करणाºया दुग्ध विकास आयुक्तांचीच बदली केल्याचा आरोप निरुपम यांनी केला.