१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळणार एकत्रित मार्कशीट; फोटो दुरुस्तीही करता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 14:38 IST2026-04-07T14:38:12+5:302026-04-07T14:38:50+5:30

महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची पडताळणीही अधिक सुलभ होणार

Students of 10th-12th standard will get a consolidated mark sheet from the board; Photo corrections will also be possible! | १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळणार एकत्रित मार्कशीट; फोटो दुरुस्तीही करता येणार!

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळणार एकत्रित मार्कशीट; फोटो दुरुस्तीही करता येणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना आता मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकत्रित स्वरूपात दिले जाणार आहे. त्याचबरोबर फोटो दुरुस्तीही करता येणार आहे. यामुळे प्रक्रिया सोपी होणार आहे. राज्य परीक्षा बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाकडून यंदापासून गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच दस्तऐवजात मिळणार असल्याने दोन वेगवेगळी कागदपत्रे सांभाळण्याचा ताण कमी होणार आहे. एकंदरीतच महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची पडताळणीही अधिक सुलभ होणार आहे.

सर्व आवश्यक माहिती एका कागदपत्रात उपलब्ध

आता विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटसाठी वेगळी प्रतीक्षा करावी लागणार नाही. परीक्षा निकालानंतर लगेचच सर्व आवश्यक माहिती एका कागदपत्रात उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमातही आधारकार्डवरील नावाप्रमाणे बदल करण्यात येणार आहे. माहिती अधिक स्पष्ट पद्धतीने सादर केली जाणार आहे.

बनावट कागदपत्रांना आळा बसण्यास मदत

नवीन दस्तऐवजावर विद्यार्थ्याचा फोटो आणि क्यूआर कोड देण्यात येणार असून त्यामुळे बनावट कागदपत्रांना आळा बसण्यास मदत होईल. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर फोटो करेक्शन पर्यायमध्ये जाऊन छायाचित्र किंवा नावातील त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

काय होणार फायदा?

  • प्रवेशप्रक्रियेत कागदपत्र पडताळणी जलद आणि सुलभ 
  • एकाच दस्तऐवजामुळे कागदपत्र हरवण्याचा धोका कमी 
  • क्यूआर कोडमुळे ऑनलाइन सत्यापन सोपे 
  • सरकारी व खासगी नोकरी अर्ज करताना प्रक्रिया गतिमान
  • डिजिटल कॉपी जतनासह शेअर करणे सोयीचे
  • शाळा व महाविद्यालयांमध्ये कागदपत्र व्यवस्थापन अधिक कार्यक्षम


या बदलामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रे अधिक सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह होतील. ज्यामुळे कागदपत्रे अधिकची गरज असणार नाही.
-दीपक माळी,  सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ

Web Title : 10वीं-12वीं के छात्रों को बोर्ड से मिलेगी संयुक्त मार्कशीट, फोटो सुधार भी!

Web Summary : महाराष्ट्र बोर्ड 10वीं और 12वीं के छात्रों के लिए संयुक्त मार्कशीट और फोटो सुधार सुविधा प्रदान करता है। इससे सत्यापन सरल होगा, दस्तावेज़ खोने का जोखिम कम होगा, और क्यूआर कोड से सुरक्षा बढ़ेगी, जिससे कॉलेज प्रवेश और नौकरी आवेदन में मदद मिलेगी।

Web Title : 10th-12th students get combined marksheet, photo correction from board.

Web Summary : Maharashtra board provides combined marksheets and photo correction for 10th and 12th students. This simplifies verification, reduces document loss, and enhances security with QR codes, aiding college admissions and job applications.