Join us

पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या; सात मजली इमारतीवरून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 10:14 IST

तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.

मुंबई: पवई आयआयटीमध्ये २६ वर्षीय दर्शन रामधन मालवीया या विद्यार्थ्यांने हॉस्टेल इमारतीच्या सातव्या मजक्यावरून उडी मारत आत्महत्या केली. दर्शन रामधन मालवीया मुळचा मध्यप्रदेशच्या इंदोरचा राहणारा आहे.

सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास त्याने उडी मारल्याचे पोलिसांचे म्हणणे असून पवई पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पवई पोलीस याप्रकरणी अधीक तपास करत आहेत. 

 

टॅग्स :मृत्यूमुंबई