बेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 07:46 IST2020-10-01T06:14:08+5:302020-10-01T07:46:44+5:30
तातडीने तिने त्याबाबत शेजारी आणि पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत कूपर रुग्णालयात पाठविला

बेरोजगारीमुळे स्ट्रगलर अभिनेत्याची आत्महत्या !
मुंबई : अंधेरी पश्चिम येथे अक्षत उत्कर्ष (२६) या बॉलिवूडमध्ये नाव कमविण्यासाठी आलेल्या स्ट्रगलर अभिनेत्याचा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. बेरोजगारी आणि कर्जाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे आंबोली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
रुममेट स्नेहा चव्हाण सोबत अंधेरीच्या एका फ्लॅटमध्ये उत्कर्ष राहत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चव्हाण स्वच्छतागृहात जाण्यासाठी उठली तेव्हा गळफास घेतलेल्या उत्कर्षला तिने पाहिले.
तातडीने तिने त्याबाबत शेजारी आणि पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत कूपर रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात कोणतीही संशयित बाब समोर आली नसून त्याने आत्महत्याच केल्याचे उघड झाले आहे.
उत्कर्ष याला लॉकडाऊनमुळे काम मिळत नव्हते. त्यामुळे बऱ्याच मित्रांकडून त्याने पैसे उधार घेतले होते. मात्र काम नसल्याने ते पैसे तो परत करू शकत नव्हता, असे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी मात्र त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला असून, त्या अनुषंगाने चौकशीची मागणी केली आहे.