संघर्ष, स्वीकार आणि यश! निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी, आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 20:01 IST2026-02-07T20:00:21+5:302026-02-07T20:01:52+5:30

निशांत खाडे यांचा जीवनप्रवास हा एका अपघातानंतरही न थांबता अधिक ठामपणे उभे राहिलेल्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट आहे.    

Struggle, acceptance and success! Nishant Khade's inspiring 25-year journey of courage, perseverance and optimism | संघर्ष, स्वीकार आणि यश! निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी, आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

संघर्ष, स्वीकार आणि यश! निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी, आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

आयुष्यात काही क्षण असे येतात जे माणसाची दिशा बदलतात. काहींसाठी ते क्षण शेवट ठरतात, तर काहींसाठी ते नव्या आशेचा किरण ठरतात. निशांत खाडे यांचा जीवनप्रवास हा अशाच एका अपघातानंतरही न थांबता अधिक ठामपणे उभे राहिलेल्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट आहे.  

मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर आलेल्या कायमस्वरूपी अपंगत्वामुळे आयुष्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने Will on Wheelz या विशेष कार्यक्रमाचं आयोजन २५ जानेवारी २०२६ रोजी Courtyard by Marriott नेरुळ येथे करण्यात आले. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नव्हता, तर संघर्षातून ध्येयाकडे आणि ध्येयाकडून यशाकडे नेणाऱ्या प्रवासाचा उत्सव होता. 

कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर अपघातापूर्वी आणि अपघातानंतरच्या निशांत खाडे यांच्या २५ वर्षांच्या खडतर जीवन प्रवासावर आधारित भावस्पर्शी चित्रफीत सादर करण्यात आली. या चित्रफितीत वेदना, जिद्द, ध्येय, चिकाटी, विनोदबुद्धी, अपयश, आत्मसंघर्ष आणि विजयाचे अनेक क्षण उलगडले गेले, ज्यांनी उपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श केला. यानंतर निशांत खाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे, योग्य निवडी कशा कराव्यात आणि दुखापतीनंतर आयुष्याचा मार्ग नव्या उद्देशाने कसा शोधावा, यावर आपले मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले, “व्हीलचेअरमुळे माझ्या दैनंदिन हालचालींचा मार्ग बदलला, पण माझी स्वप्नं, माझी उद्दिष्टे, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचं बळ कधीच कमी झालं नाही. ‘Will on Wheelz’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात साथ दिलेल्या सर्व लोकांचे आभार व्यक्त करण्याची आणि घडलेल्या घटनेची आठवण करून देण्याची संधी मला मिळाली. माझे प्रयत्न आणि संघर्ष हेच सांगतात की दुखापतीनंतर आयुष्य थांबत नाही—ते बदलते, घडते आणि अधिक अर्थपूर्ण बनते.”

यानंतर झालेल्या पॅनल चर्चेत डॉ. केतना मेहता, शिवजीत सिंग राघव, अरविंद रमेश प्रभू, डॉ. प्रविण आर. अमीन आणि निशांत खाडे यांनी सहभाग घेतला. वैद्यकीय तज्ज्ञांचे अनुभव, पुनर्वसनाची प्रक्रिया, मार्गदर्शनआणि प्रत्यक्ष आयुष्यातील संघर्ष यांचा संगम साधत पुनर्प्राप्ती, जगण्याची जिद्द आणि समावेशनावर सखोल व संवेदनशील चर्चा झाली.

कार्यक्रमात निशांत खाडे यांच्या Access4All Foundation याउपक्रमाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभता, समावेशन आणि स्वावलंबन वाढवणे, त्यांचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागवण्यासाठी जनजागृती, धोरणात्मक हस्तक्षेपआणि सामाजिक संवादाच्या माध्यमातून ही संस्था सातत्याने कार्यरतआहे.तसेच निशांत खाडे यांच्या ‘Beyond the Barriers’ या व्हीलचेअरवरून संपूर्ण भारतभर केलेल्या प्रवासाचा उल्लेख करण्यात आला. याप्रवासाच्या माध्यमातून दिव्यांगतेबाबतचे गैरसमज, सुलभतेची गरज आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देशपातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

या दीर्घ प्रवासात Nina Foundation यांनी दिलेला वैद्यकीय, मानसिक आणि भावनिक आधार निशांत खाडे यांच्या आयुष्यात निर्णायक ठरला. विशेषतः अरविंद प्रभू यांनी दिलेला निस्वार्थ आधार, प्रेम आणि जिव्हाळा हा या प्रवासाचा खंबीर आधारस्तंभ ठरला. अडचणीच्या काळात दिलेला हात केवळ आधार ठरत नाही, तर आयुष्याला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा देतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी निशांत खाडे यांच्या प्रवासात मोलाची भूमिका बजावलेल्या डॉक्टर, थेरपिस्ट, मार्गदर्शक आणि हितचिंतकांचा सन्मान करण्यात आला. 

हा संपूर्ण प्रवास एक ठाम आणि आश्वासक संदेश देऊन जातो— अपघात शरीराला मर्यादा घालू शकतो, पण स्वप्नांना नाही. दुखापत हालचाली थांबवू शकते, पण विचारांना नाही. परिस्थिती आयुष्य बदलू शकते, पण इच्छाशक्तीला कधीच हरवू शकत नाही. वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ मार्गदर्शन, सातत्यपूर्ण पुनर्वसन आणि सर्वातमहत्त्वाचे म्हणजे विश्वास देणारी माणसे सोबत असतील, तर दुखापती पलीकडचे आयुष्य केवळ संघर्षमय राहत नाही, तर ते अधिकसन्मानपूर्ण, उद्देशपूर्ण आणि समाजाला दिशा देणारे ठरते. निशांत खाडे यांचा २५ वर्षांचा प्रवास ही केवळ वैयक्तिक यशाची कथा  नसून, प्रत्येक अडचणीत सापडलेल्या आणि परिस्थितीशी झगडणाऱ्या व्यक्तीसाठी आशेचा किरण आहे. हार मानू नका. थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आयुष्य थांबत नाही. ते तुमच्या जिद्दीप्रमाणे योग्य दिशेने घडत जातं.
 

Web Title : निशान्त खाडे की 25 साल की यात्रा: लचीलापन, स्वीकृति और प्रेरणादायक सफलता की कहानी।

Web Summary : निशान्त खाडे के 'विल ऑन व्हील्ज़' ने चोट के बाद उनकी 25 साल की यात्रा का जश्न मनाया। कार्यक्रम में उनके लचीलेपन पर प्रकाश डाला गया, जिसमें उनके संघर्षों और जीत को दर्शाने वाली एक फिल्म दिखाई गई। खाडे ने जीवन की चुनौतियों के अनुकूल होने पर अंतर्दृष्टि साझा की और विकलांगता समावेश के लिए उनके एक्सेस4ऑल फाउंडेशन के काम पर भी प्रकाश डाला गया। उनकी यात्रा दृढ़ता को प्रेरित करती है।

Web Title : Nishant Khade's 25-year journey: Resilience, acceptance, and inspiring success story.

Web Summary : Nishant Khade's 'Will on Wheelz' celebrated his 25-year journey post-injury. The event highlighted his resilience, featuring a film showcasing his struggles and triumphs. Khade shared insights on adapting to life's challenges and his Access4All Foundation's work for disability inclusion was also highlighted. His journey inspires perseverance.