Join us

ई-बाइक टॅक्सीला संघटनांकडून तीव्र विरोध; निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 07:36 IST

बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारने ई-बाइक टॅक्सीला दिलेल्या मंजुरीविरोधात महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीमार्फत २१ मे रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर निषेध आंदोलन केले जाणार आहे. २७ एप्रिलच्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 

बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-बाईक टॅक्सी आणावी किंवा नाही यासाठी शासनाकडून नेमलेल्या समितीसमोर कृती समितीने ई-बाइक टॅक्सीला विरोध केला तसेच त्याचे कारणही मांडले.

१५ लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात शासनाने ई-बाइक टॅक्सी सेवेला परवानगी देण्याआधी संघटनेबरोबर चर्चा करणे आवश्यक होते, परंतु सरकारने एकतर्फी निर्णय घेत ई-बाइक टॅक्सीला परवानगी दिली. ई-बाइक टॅक्सी /बाइक पुलिंग सुरू झाल्यास  १५ लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात येणार असल्याचे ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे शशांक राव यांचे म्हणणे आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या उपजीविकेला धोका असल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :बाईक