Join us  

लसीकरणानंतरही कोरोनाच्या नियमांचे कडक पालन : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 5:55 AM

मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलीस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदी फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून, महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरित्या राबवावी व सर्व यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखत केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे. तसेच लसीकरणानंतरही कोरोनाच्या निर्बंधाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलीस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदी फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल. त्यामुळे राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया, त्याची वाहतूक तसेच लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल, याची दक्षता या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

काेराेना योद्धयांना प्रथम प्राधान्यn पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलीस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदी फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल. 

टॅग्स :मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेकोरोनाची लस