मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक मोठे शेल्टर होम उभारणार आहे. बीएमसीचे हे कुत्र्यांचे अभयारण्य पाच एक जागेवर उभारले जाणार आहे. मालवणी येथील जागेत हा शेल्टर असणार आहे. या प्रस्तावाला अद्याप नगरविकास खात्याकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. याला मंजूरी मिळाल्यानंतर मुंबईत पहिले कुत्र्यांचे अभयारण्य उभे राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२५ रोजी भटक्या कुत्र्यांच्यासंदर्भातील याचिकावर निकाल दिल्यानंतर बीएमसीकडून या हालचाली करण्यात आल्या आणि प्रस्ताव तयार केला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील सरकारांना मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणांवरून हटवा आणि शेल्टर होममध्ये ठेवण्याचे निर्देश दिले होते.
मुंबईत हजारो मोकाट कुत्री
मुंबई महापालिकेच्या "भटक्या कुत्र्यांच्या संख्या व्यवस्थापनाचे आणि निर्बीजीकरणाच्या प्रभावाचे मूल्यमापन" या रिपोर्टनुसार, मुंबईत सध्या ९० हजार ७५७ मोकाट कुत्री आहेत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे २०१४ मध्ये मुंबईतील मोकाट कुत्र्यांची संख्या ९५ हजार इतकी होती.
सध्या मुंबई महापालिकेकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे आणि त्यांना पुन्हा त्यांना जिथून आणण्यात आले होते, त्याच ठिकाणी सोडण्याचे काम केले जाते. २०२४ मध्ये ६२.९ टक्के कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले गेले होते.
असा आहे बीएमसीचा नवा प्लॅन
मुंबई महापालिकेकडून नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या कार्यक्रमानुसार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करायचे आणि त्यांना परत ज्या भागातून आणण्यात आले, तिथे न सोडता तयार केलेल्या शेल्टर होममध्ये सोडण्यात येणार आहे.
सर्वात आधी जास्त वाहतूक कोंडी आणि संवदेशनशील भागातील मोकाट कुत्र्यांना पकडण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णालये, शाळा, रेल्वे स्थानके, क्रीडांगणे आणि बस स्थानके यांचा समावेश असणार आहे. ही सर्व प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार होणार आहे.
Web Summary : Mumbai's BMC will build a five-acre shelter home for stray dogs in Malvani. This follows a Supreme Court directive to relocate strays from public areas. Mumbai has approximately 90,757 stray dogs. The BMC plans to sterilize and relocate dogs to the shelter, prioritizing high-traffic zones.
Web Summary : मुंबई बीएमसी मालवणी में बेसहारा कुत्तों के लिए पांच एकड़ का आश्रय गृह बनाएगी। यह सार्वजनिक क्षेत्रों से आवारा कुत्तों को स्थानांतरित करने के लिए सुप्रीम कोर्ट के निर्देश के बाद है। मुंबई में लगभग 90,757 बेसहारा कुत्ते हैं। बीएमसी उच्च यातायात क्षेत्रों को प्राथमिकता देते हुए कुत्तों को आश्रय में स्थानांतरित करने की योजना बना रही है।