मुंबई - अभिनेत्री मौनी रॉय कार अपघातातून थोडक्यात वाचली आहे. तिच्या कारवरमुंबईत सुरु असलेल्या मेट्रो कामादरम्यान जुहू येथे मोठा दगड पडला. या दुर्घटनेत अभिनेत्री मौनी यांच्या कारवरील सन रूफ तुटून नुकसान झाले आहे. सुदैवाने अभिनेत्री मौनीला दुखापत झाली नाही. मात्र, या दुर्घटनेला घाबरलेल्या मौनीने याबाबत व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओतून तिने मी आता कामासाठी निघाले आहे. जुहू सिग्नलवर एक मोठा दगड कारवर पडला. ११ व्या मजल्याइतक्या उंचीवरून हा दगड पडला असून मी काहीच करू शकत नाही. मात्र, विचार करा कोणी रस्त्यावरून चालत असतं तर काय झालं असतं. मुंबई मेट्रोच्या निष्काळजीपणासाठी काय करावं, कोणीतरी सल्ला द्यावा असं नमूद केलं आहे. शेअर केलेल्या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येतं आहे की, नागिन अभिनेत्री मौनी या दुर्घटनेपासून थोडक्यात बचावली आहे. व्हिडिओत मौनी सन रूफ दाखवत आहे.
बाल बाल बच गयी! मेट्रो कामादरम्यान दगड पडला अभिनेत्रीच्या कारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 15:02 IST
घाबरलेल्या मौनीने याबाबत व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
बाल बाल बच गयी! मेट्रो कामादरम्यान दगड पडला अभिनेत्रीच्या कारवर
ठळक मुद्देसुदैवाने अभिनेत्री मौनीला दुखापत झाली नाही.जुहू सिग्नलवर एक मोठा दगड कारवर पडला. या दुर्घटनेत अभिनेत्री मौनी यांच्या कारवरील सन रूफ तुटून नुकसान झाले आहे.