मुंबई - राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरला असून, मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा १६ ते १७ अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे गारेगार झालेल्या मुंबईकरांना बोचरी थंडी अनुभवता येणार आहे. मुंबई शेजारचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानचे किमान तापमान १८ नोंदविण्यात आले.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १८.४ नोंदविण्यात आले. १४ ते २० नोव्हेंबर आणि २१ ते २७ नोव्हेंबर या दोन आठवड्यांत महाराष्ट्र व मध्य भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले, हिमालयासोबतच उत्तर भारताकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे राज्य गारठले आहे.
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्येठाणे २१.४मुंबई १८.४माथेरान १८डहाणू १७.६ सांगली १५.६ सोलापूर १५.६ सातारा १४.४छ.संभाजीनगर १३.१महाबळेश्वर १२.९अहिल्यानगर ११.४मालेगाव ११.२बीड ११नाशिक १०.९जळगाव ९.५
सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार असून, किमान तापमान १६ ते १७ अंश नोंदविले जाईल. शुक्रवारी नोंदविण्यात आलेले मुंबईचे किमान तापमान थंडीच्या हंगामातील आतापर्यंतचे निचांकी किमान तापमान आहे.
Web Summary : Mumbai experiences a cold snap with temperatures dropping to 18.4°C, mirroring Matheran. Further dips to 16-17°C are expected over the weekend. Cold winds from the Himalayas are bringing chilly conditions across Maharashtra, providing residents with a taste of winter. This is the lowest temperature recorded this season.
Web Summary : मुंबई में तापमान 18.4 डिग्री सेल्सियस तक गिरने से ठंड का अनुभव हो रहा है, जो माथेरान जैसा है। सप्ताहांत में तापमान 16-17 डिग्री सेल्सियस तक गिरने की संभावना है। हिमालय से आने वाली ठंडी हवाएं महाराष्ट्र में ठंडक ला रही हैं, जिससे निवासियों को सर्दी का एहसास हो रहा है। यह इस मौसम का सबसे कम तापमान है।