Join us

STची दिवाळी दणक्यात, नोव्हेंबरला ९४१ कोटी उत्पन्न; ६० लाख प्रवासी ३१.३६ कोटी प्रतिदिन कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 05:20 IST

मागील वर्षाच्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांची वर्दळ वाढल्यामुळे तब्बल  ९४१ कोटी रुपये इतके उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदिन प्राप्त केले आहे. 

मागील वर्षाच्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दिवाळीच्या काळात १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा ही भाडेवाढ नसताना देखील वाढलेले विक्रमी उत्पन्न हे एसटीवर सर्वसामान्य प्रवाशांनी दाखवलेले विश्वासाचे द्योतक असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.

एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढले असले तरी, एसटीचा खर्चदेखील वाढलेला आहे.  इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, टायर व सुट्ट्या  भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीचा खर्च वाढीवर झालेला आहे. त्यामुळे संचित तोटा ११ हजार कोटीपर्यंत पोहोचला आहे. तसेच या नोव्हेंबर महिन्यात नियमित खर्चाबरोबरच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे ५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा एसटीच्या तिजोरीवर पडला आहे.   

टॅग्स :एसटीराज्य सरकार