Join us

राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 06:25 IST

मराठा आरक्षणानुसार ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळेल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असलेल्यांना ‘ईडब्ल्यूएस’अंतर्गत संधी दिली जाईल.

मुंबई :  कोरोना आणि मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य सेवेची पूर्व परीक्षा १४, तर तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी होईल.

मराठा आरक्षणानुसार ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळेल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असलेल्यांना ‘ईडब्ल्यूएस’अंतर्गत संधी दिली जाईल. १५ जानेवारीपर्यंत सुधारित अर्ज भरून घेतले जातील. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य खबरदारी घेऊनच राज्यातील आठशे परीक्षा केंद्रांवर परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे लागेल.

कमाल संधी संपलेल्यांमध्ये संभ्रमावस्थायंदा कोरोना आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे कमाल संधी संपुष्टात आलेल्या उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असेल का? त्यांना परीक्षा देता येईल का? अशा अनेक प्रश्नांबाबत काहीच स्पष्टता नसल्याने संभ्रमावस्था असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली. 

असे हाेणार परीक्षांचे आयाेजनn१४ मार्च रोजी राज्य सेवेची पूर्व परीक्षाn२७ मार्च रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षाn११ एप्रिल राेजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा

टॅग्स :एमपीएससी परीक्षापुणे