State Co-operative Bank scam; What is in the indictment? | राज्य सहकारी बँक घोटाळा; काय आहे दोषारोपपत्रात?

राज्य सहकारी बँक घोटाळा; काय आहे दोषारोपपत्रात?

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी वैधानिक समितीने बँकेचे तत्कालीन संचालक व सदस्यांवर दाखल केलेल्या दोषारोपपत्रातील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

(१) साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अ‍ॅरेंजमेंट (सीएमए) च्या निकषांशी विसंगत आहे. त्यामुळे बँकेला २९,७१४.१९ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी बँकेच्या ३७ संचालकांना दोषी ठरविण्यात आले आहे.

(२) १४ साखर कारखान्यांना कर्ज देताना पुरेसे तारण घेतले नाही व राज्य सरकारकडून हमीही घेतली नाही. त्यामुळे बँकेचे ४७,४६५. २८ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी बँकेच्या ३८ संचालकांना दोषी ठरविण्यात आले.

(३) चार साखर कारखान्यांकडून तारण न घेताच संचालकांनी कर्ज मंजूर केले. अपुरे तारण व हमी नसल्याने तसेच बँकेची संरक्षित संपत्ती विकूनही २०,३४८.९२ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी संचालक आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

(४) लघुउद्योगांना कर्ज मंजूर करताना व त्याचे वाटप करताना निश्चित करण्यात आलेल्या धोरणाचे उल्लंघन करून चार सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आले. त्यामुळे १७७.३१ लाखांचे नुकसान झाले. त्यात ५३ संचालक व अधिकारी दोषी आहेत.

(५) सहा साखर कारखान्यांची संपत्ती विकताना बँकेने नियमांचे उल्लंघन केले. ठरलेल्या रकमेपेक्षा कमी किंमतीत बँकेची मालमत्ता विकली. त्यामुळे बँकेचे ८६५५.९६ लाखांचे नुकसान झाले. सहा साखर कारखाने आणि सूत गिरण्यांकडून कोणतीही हमी न घेता कर्ज वाटप करण्यात आले. त्यात ७५ संचालक आणि बँक अधिकारी दोषी आहेत.

(६) तीन साखर कारखान्यांची संपत्ती घेताना अनियमितता झाली. संपत्तीच्या किंमतीबाबत खासगीरित्या केलेल्या वाटाघाटामुळे बँकेला १९१४.५१ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी ७२ संचालक जबाबदार आहेत.

(७) संचालक मंडळाने किसान स्टार्च, सी. एस. देवपूर, धुळे याची सुरक्षित मालमत्ता कमी किंमतीत विकली. परिणामी बँकेला ३६५ लाखांचे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी ४५ संचालकांना जबाबदार धरण्यात आले.

(८) बँकिंग रेग्युलेशन्स अ‍ॅक्टचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने पाच लाखांचा दंड बँकेला ठोठावला आणि त्यासाठी ७५ संचालकांना जबाबदार ठरविले.

(९) महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला संचालकांच्या स्टडी टूरसाठी ७.३० लाख आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आली होती. मात्र, कोणीही स्टडी टूरला गेले नाही.

यांच्यावर होणार गुन्हा दाखल

१)माणिकराव पाटील, २) निलेश नाईक, ३) विजयसिंह मोहिते पाटील, ४) अजित पवार, ५) दिलीपराव देशमुख, ६) राजेंद्र शिंगणे, ७) मदन पाटील, ८) हसन मुश्रीफ, ९) मधुकरराव चव्हाण, १०) शिवराम जाधव, ११) गुलाबराव शेळके, १२) माधवराव पाटील, १३) सिद्दरामप्पा अल्लुरे, १४) विलासराव पाटील, १५) रवींद्र दुर्गाकर, १६)अरविंद पोरेडीवार, १७) सदाशिव मंडलिक,
१८) यशवंतराव गडाख, १९) लीलावती जाधव, २० ) मधुकरराव जौंजळ, २१) प्रसाद तनपुरे, २२) आनंदराव चव्हाण, २३) सरकार जितेंद्रसिंग रावळ, २४) बाबासाहेब वसदे, २५) नरेशचंद्र ठाकरे, २६) नितीन पाटील, २७) किरण देशमुख, २८ ) तान्हाजीराव चोरगे, २९) दत्तात्रय पाटील, ३०) राजेंद्र जैन, ३१) तुकाराम ढिंगोळे, ३२) मीनाक्षी पाटील, ३३) रवींद्र शेट्ये, ३४) पृथ्वीराज देशमुख, ३५) आनंदराव अडसूळ, ३६) राजेंद्र पाटील, ३७) अंकुश पोळ, ३८) नंदकुमार धोटे, ३९) जगन्नाथ पाटील, ४०) सुरेश देशमुख, ४१) उषाताई चौधरी, ४२) संतोषकुमार कोरपे, ४३) जयंत पाटील, ४४) देविदास पिंगळे, ४५) एन. डी. कांबळे, ४६) राजवर्धन कदमबांडे, ४७) गंगाधरराव देशमुख, ४८) रामप्रसाद कदम, ४९) धनंजय दलाल, ५०) जयंतराव आवळे, ५१) वसंतराव शिंदे, ५२)डीएम माहोल, ५३) पांडुरंग फुंडकर, ५४)ईश्वरलाल जैन, ५५) वसंतराव पवार, ५६ ) रंजन तेली, ५७) दिलीपराव सोपल, ५८) चंद्रशेखर घुले- पाटील, ५९) विलासराव जगताप, ६०) अमरसिंग पंडित, ६१) योगेश पाटील, ६२) शेखर निकम, ६३) श्रीनिवास देशमुख, ६४) डी. एम. रवींद्र देशमुख, ६५) विलासराव शिंदे, ६६) यशवंत पाटील, ६७) बबनराव तायवंडे, ६८) अविनाश अरिंगळे, ६९) रजनी पाटील, ७०) लक्ष्मणराव पाटील, ७१)माणिकराव कोकाटे, ७२) राहुल मोटे, ७३) शिवाजीराव नलावडे, ७४) सुनील फुंदे, ७५) शैलजा मोरे .

 

Web Title: State Co-operative Bank scam; What is in the indictment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.