Join us

वर्षाची सुरुवात श्रीगणेशाच्या दर्शनाने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 14:00 IST

श्रीसिद्धिविनायकाच्या भक्तांची गर्दी लक्षात घेता दर्शनाच्या वेळा दर्शनी भागावर लावण्यापासून आशीर्वचन रांग, अपंग, ज्येष्ठ, गरोदर स्त्रियांसह महिलांची, मुखदर्शनाच्या रांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून देण्यात आली. 

मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात श्रीगणेशाच्या दर्शनाने व्हावी यासाठी भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी दाखल होणार आहेत. या‌वेळी दाखल होणाऱ्या भक्तांना गणपती बाप्पाचे नीट दर्शन घेता यावे म्हणून मंदिर व्यवस्थापनाने जय्यत तयारी केली आहे. 

श्रीसिद्धिविनायकाच्या भक्तांची गर्दी लक्षात घेता दर्शनाच्या वेळा दर्शनी भागावर लावण्यापासून आशीर्वचन रांग, अपंग, ज्येष्ठ, गरोदर स्त्रियांसह महिलांची, मुखदर्शनाच्या रांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून देण्यात आली. 

१ जानेवारीदर्शन - पहाटे ३:१५ ते पहाटे ५:१५आरती - पहाटे ५:३० ते पहाटे ६दर्शन - सकाळी ६ ते दुपारी ११:५५नैवेद्य - दुपारी १२:५ ते दुपारी १२:३०दर्शन - दुपारी १२:३० ते सायंकाळी ७धुपारती - सायंकाळी ७ ते सायंकाळी ७:१०आरती - सायंकाळी ७:३० ते रात्री ८दर्शन - रात्री ८ ते रात्री ११शेजारती - रात्री ११:३०

-  अपंग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या रांगेची सुरुवात कोहिनुर हॉटेल समोरील साने गुरुजी गार्डन गेट येथून होईल. -  तर, मुखदर्शनाच्या रांगेची सुरुवात एस.के. बोले मार्ग, आगर बाझार येथून सुरू होईल. -  रात्री ११ वाजता दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात येतील, असे मंदिराकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :नववर्षमंदिर