Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवलीचे नॅशनल पार्क जॉगर्ससाठी सुरू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 18:52 IST

खासदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

मुंबई : बोरीवलीचे नॅशनल पार्क सह गोरेगावचे आरे तसेच राणीचा बाग ही प्रमुख उद्याने जॉगर्ससाठी सुरू करा अशी मागणी उत्तर मुंबई भाजपा खासदाराने गोपाळ शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात व्हिडिओ देखिल सोशल मीडियावर जारी केला आहे.

आज राष्ट्रीयत्व क्रीडा दिनाचे औचित्य साधत खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येथील भाजपा कार्यकर्त्यांनी येत्या 1 सप्टेंबर पासून नॅशनल पार्क जॉगर्ससाठी सुरू करा या मागणीसाठी बोरिवलीचे आमदार सुनील राणे, नगरसेवक विद्यार्थी सिंह यांच्यासमवेत बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास भेट दिली. सर्वसामान्यांसाठी किमान जॉगिंग सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असून दि,2 जुलै पासून सदर मागणी मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांना आपण करत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. नॅशनल पार्कच्या नैसर्गिक हवेत जॉगिंग करुन मुंबईकर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतील आणि कोरोना साथीवर मात करू शकतील असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

 

टॅग्स :पर्यावरणमुंबई