Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची घोषणा १ जून नंतरच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 21:36 IST

अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

 

मुंबई - लॉकडाऊन दरम्यान कर्मचारी भरती आयोगाने म्हणजेच  स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती परीक्षांबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे.  देशातील कोविड - १९ विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की १ जून २०२० रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे. 

अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आयोगाने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे.  नव्या तारखांची घोषणा १ जूननंतरच करण्यात येईल असे  करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपरीक्षा