Join us

ST Worker Strike : मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते, सुप्रिया सुळे यांनी जोडले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:11 IST

ST Worker Strike : आंदोलन शांत झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलीस बांधवांचे जाहीर आभार मानले. 

मुंबई - मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Workers Strike) संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा चिघळले आहेत. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेल करण्यात आली. तसेच, शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानकपणे झालेल्या या आंदोलनासमोर पोलिसही हतबल झालेले. मात्र, मुंबईपोलिसांनी चिघळत चालले आंदोलन शांत केले आणि पोलीस बंदोबस्तात एनसीपीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना निवासस्थानी सुरक्षितपणे पोहोचवले. त्यानंतर आंदोलन शांत झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलीस बांधवांचे जाहीर आभार मानले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे.  

माझे आईवडील आणि मुलगी घरी असताना घरावर आंदोलन करत चपला फेकण्यात आल्या. मात्र, मुंबई पोलीस तात्काळ पोहोचल्याने आम्ही सुरक्षित राहिलो असून मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते असे सुप्रिया सुळे घराबाहेर येऊन पोलिसांना हात जोडून सांगत होत्या. आंदोलनाच्या सुरुवातीला जेव्हा पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सुप्रिया सुळे आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी आंदोलक तीव्र झाल्याने पोलिसांनी सुप्रिया सुळे यांना निवासस्थानी सोडले. दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या घरी माझे आईवडील, मुलगी आहे. त्यांची सुरक्षितता तपासून येते. शांततेच्या मार्गाने मी त्यांना अनेकवेळा नम्रपणे विनंती केलेली आहे. हात जोडलेत. मी त्यांच्याशी आता बोलायला तयार आहे. माझे आईवडील, माझी मुलगी घरामध्ये आहे. मी या सगळ्यांसोबत या क्षणी चर्चा करायला तयार आहे. मी पुढच्या मिनिटाला चर्चेला बसायला तयार आहे. माझी तुम्हाला विनम्रपणे विनंती आहे.. मी माझ्या आईवडील आणि मुलीला भेटून येते, त्यांची सुरक्षितता तपासून मग मी तुमच्याशी बोलते.

 

'सिल्वर ओक'वरील परिस्थिती चिघळल्याचं लक्षात येताच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीनं दाखल झाला. मुंबई पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील देखील पोहोचले. त्यानंतर सुप्रिया सुळेंना सुखरुपरित्या घरात पोहोचल्या. कुटुंबीयांची विचारपूस केल्यानंतर त्या पुन्हा बाहेर आल्या आणि त्यांनी हात जोडून मुंबई पोलिसांचे आभार मानले. या आंदोलनाप्रकारणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या चर्चा झाली आहे.  

टॅग्स :सुप्रिया सुळेशरद पवारएसटी संपमुंबईपोलिस