Join us  

एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबाशिवाय साजरी करावी लागणार होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:54 AM

एसटी महामंडळाने सुमारे ३ हजारांहून अधिक चालक व वाहकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करत आगार व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.

मुंबई  - एसटी महामंडळाने सुमारे ३ हजारांहून अधिक चालक व वाहकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करत आगार व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. त्यामुळे बदल्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतरही, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग अशा विविध आगारांतील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याअभावी कुटुंबाविना होळी साजरी करावी लागणार आहे.याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता, होळीनिमित्त मुंबई व ठाण्यातून कोकणाकडे जाणाºया गाड्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे या आगारातील कर्मचाºयांच्या बदल्या होळीनंतर करण्याचे नियोजित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे सातशे कर्मचाºयांना बदल्यांचे आदेश दिले असून, त्यापैकी ६५०हून अधिक कर्मचाºयांना कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती आहे. याउलट न्यायालयात प्रकरण असल्याने सुमारे ६० कर्मचाºयांना कार्यमुक्ती देण्यात आलेली नाही. मुंबई जिल्ह्यात मात्र उलट परिस्थिती दिसते. मुंबईत सव्वाचारशेहून अधिक कर्मचाºयांना बदल्यांचे आदेश असून, सुमारे ५० कर्मचाºयांना कार्यमुक्त करण्यात आले आहे, तर साडेतीनशेहून अधिक कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.ठाणे जिल्ह्यातही ६००हून अधिक कर्मचाºयांच्या बदल्यांचे आदेश असून, अद्याप केवळ ४०० कर्मचाºयांना बदली देण्यात आली आहे, तर उर्वरित २०० कर्मचारी बदल्यांअभावी कुटुंबाशिवाय होळी साजरी करतील.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीचशे कर्मचाºयांपैकी १८०हून अधिक कर्मचाºयांना कार्यमुक्त केले असून, रायगड जिल्ह्यात बदली आदेश असलेल्या सुमारे १९० चालकांपैकी ८०हून अधिक चालकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, १८०हून अधिक वाहकांना बदली आदेश असूनही न्यायालयीन आदेशामुळे बदलीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.अंमलबजावणीस जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोपहोळी आणि शिमगा असे दोन्ही सण कुटुंबासह साजरे करता यावे, म्हणून गावी जाणाºया चाकरमान्यांना योग्य वेळी इच्छीतस्थळी पोहोचविण्याचे काम एसटी कर्मचारी करतील. मात्र, शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा आरोप कर्मचाºयांकडून होत आहे. यामुळे कर्मचाºयांमध्ये प्रचंड रोष असल्याची माहिती एसटी कर्मचाºयांच्या एका नेत्याने दिली.

टॅग्स :राज्य परीवहन महामंडळमहाराष्ट्र