Join us

एसटी कर्मचाऱ्यांकडून १२,५०० रु. सानुग्रह अनुदानाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 00:51 IST

राज्य शासनाच्या निर्णयानुसार १२,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेने केली.

मुंबई : एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे १० हजार रुपये मंजूर केले. मात्र, राज्य शासनाच्या निर्णयानुसार १२,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेने केली.सुधारित वेतन श्रेणीचा कमाल टप्पा विचारात घेऊन किमान १२,५०० रुपये सानुग्रह अनुदान द्या, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. दरम्यान, महामंडळाच्या ३१ आॅक्टोबर, २०१५च्या परिपत्रानुसार ९० टक्के कर्मचाºयांचे सुधारित मूळ वेतन २५ हजारांपेक्षा जास्त असल्याने त्यांना सानुग्रह अनुदान मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.

टॅग्स :एसटी