शांतीमय जीवनासाठी अध्यात्म आणि योगाची गरज, केंद्रीय मंत्री गडकरी यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 07:52 IST2025-04-01T07:51:39+5:302025-04-01T07:52:00+5:30

Nitin Gadkari News: इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा संबंध आध्यात्माशी आहे. भारतीय जीवनशैली आता जगभरात स्वीकारली जात आहे. अंतर योग फाऊंडेशनचे प्रमुख आचार्य उपेंद्रजी यांनी विश्वशांतीच्या उद्दिष्टाने केलेले यज्ञ महत्त्वपूर्ण आहेत.

Spirituality and yoga are necessary for a peaceful life, says Union Minister Gadkari | शांतीमय जीवनासाठी अध्यात्म आणि योगाची गरज, केंद्रीय मंत्री गडकरी यांचं विधान

शांतीमय जीवनासाठी अध्यात्म आणि योगाची गरज, केंद्रीय मंत्री गडकरी यांचं विधान

 मुंबई -  इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा संबंध आध्यात्माशी आहे. भारतीय जीवनशैली आता जगभरात स्वीकारली जात आहे. अंतर योग फाऊंडेशनचे प्रमुख आचार्य उपेंद्रजी यांनी विश्वशांतीच्या उद्दिष्टाने केलेले यज्ञ महत्त्वपूर्ण आहेत. शांतीमय जीवनासाठी अध्यात्म व योगाची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

फोर्ट येथील अंतर योग फाऊंडेशन येथे आचार्य उपेंद्रजी यांच्या गुरू गीता या टिप्पणीसह असलेल्या ग्रंथाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी देशभरातील आध्यात्मिक गुरू आणि साधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा ग्रंथ आचार्य उपेंद्रजी यांनी अचूक संकलित केल्याचे ते म्हणाले.

गुरू म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे
महाचंडी होमच्या यशस्वी आयोजनाबद्दल गडकरी यांनी कौतुक करून हा प्रकाशन सोहळा म्हणजे भारताचा विश्वगुरू म्हणून प्रतिष्ठित करण्याच्या दिशेने एक सशक्त पाऊल असल्याचे ते म्हणाले. 

भारताला विश्वगुरू करण्यापूर्वी गुरू म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. भारताला विश्वगुरू करण्यासाठी आध्यात्माची जोड महत्त्वाची आहे. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत आध्यात्मिक शक्तीही महत्त्वाची असून गडकरींच्या कार्याने ते आधीच सुरू केले असल्याचे आचार्य उपेंद्रजी यावेळी म्हणाले.

Web Title: Spirituality and yoga are necessary for a peaceful life, says Union Minister Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.