Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांसाठी अमृता यांचं खास ट्विट, लक्ष्मीपूजनाचे फोटो केले शेअर

By महेश गलांडे | Updated: November 14, 2020 20:56 IST

यंदाच्या वर्षातील पहिलाच सण उत्साहात साजरा होतोय तो म्हणजे दिवाळी. अनलॉक आणि मिशन बिगेन अगेननंतर दिवाळीच्या सणाने सर्वांनाचा दिलासा दिला आहे

ठळक मुद्देयंदाच्या वर्षातील पहिलाच सण उत्साहात साजरा होतोय तो म्हणजे दिवाळी. अनलॉक आणि मिशन बिगेन अगेननंतर दिवाळीच्या सणाने सर्वांनाचा दिलासा दिला आहे

मुंबई - दिवाळीच्या सणानिमित्त देशभरात वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. कोरोनाचा अंध:कार दूर होऊन कोरोनामुक्त पहाट होण्याची वाट देशवासीय पाहत आहेत. त्यामुळे, गेल्या 7 महिन्यांतील हा पहिलाच सण उत्साहात आणि आनंदात साजरा होताना दिसत आहेत. देशात अद्यापही कोरोनाचं सावट आहे, पण कोरोनावर मात करण्यात भारताने मोठं यश मिळवलंय. त्यामुळेच देशभरात दिवाळी साजरी होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरी सहकुटुंब लक्ष्मीपूजन केले.

यंदाच्या वर्षातील पहिलाच सण उत्साहात साजरा होतोय तो म्हणजे दिवाळी. अनलॉक आणि मिशन बिगेन अगेननंतर दिवाळीच्या सणाने सर्वांनाच दिलासा दिला आहे. कोरोनाची भीती घालवून आशावादी प्रकाश घराघरात पडल्याचं दिसत आहे. देशभरात सायंकाळी सर्वत्र दिवाळीचे लक्ष्मीपूजन करण्यात आहे. राजकीय नेते, सेलिब्रिटींपांसून सर्वसामान्य नागरिकांच्या घरीही तेच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या घरी लक्ष्मीपूजन केले. अमृता फडणवीस यांनी या पूजचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह असतात, आपल्या सामाजिक उपक्रमांबद्दलही त्या नेहमीच फोटो शेअर करुन माहिती देतात. तसेच, कुटुंबातील आनंदाचे क्षणही चाहत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी शेअर करतात. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर मात करुन घरी परतल्यानंतर त्यांनी फोटो शेअर केले होते. त्यानंतर, आज घरातील लक्ष्मीपूजनचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. कुटुंबासमवेत पूजा केल्यानंतर, देवेंद्र यांच्यासाठी खास मेसेज अमृता फडणवीस यांनी लिहिला आहे. तुमची साथ ही दिवाळीच्या मिठाईपेक्षा गोड आहे, असे म्हणत कुटुंबाची साथ हीच सर्वात मौल्यवान आणि गोड असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअमृता फडणवीसदिवाळीट्विटर