कर्जत यार्ड सुधारणेसाठी विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 06:25 IST2023-04-12T06:25:14+5:302023-04-12T06:25:32+5:30

कर्जत यार्ड सुधारणेसाठी १२ आणि १४ एप्रिलला विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Special traffic-power block for Karjat yard improvement | कर्जत यार्ड सुधारणेसाठी विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

कर्जत यार्ड सुधारणेसाठी विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक

मुंबई :  कर्जत यार्ड सुधारणेसाठी १२ आणि १४ एप्रिलला विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक पहिला 
१२ एप्रिलला कर्जत यार्ड बदलासंदर्भात कर्जत स्थानकावर ओव्हर हेड वायर संरचना उभारण्यासाठी आणि लोड हस्तांतरणासाठी घाट विभाग ते कर्जतपर्यंत सकाळी १०.५० ते दुपारी १.५० पर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल.

ब्लॉक दुसरा 
 १४ एप्रिलला कर्जत यार्ड बदलासंदर्भात कर्जत स्थानकावर ओव्हर हेड वायर संरचना उभारण्यासाठी आणि लोड हस्तांतरणासाठी घाट विभाग ते कर्जतपर्यंत दुपारी  १.४५  ते दुपारी ३.४५ पर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल. 

लोकलवर परिणाम  
 कर्जतहून १३.१५ वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि १४.५५ वाजता खोपोलीहून सुटणारी कर्जत लोकल रद्द होतील.
 सीएसएमटीवरून १२.२० वाजता सुटणारी खोपोली लोकल कर्जतपर्यंतच चालवली जाईल. 
 खोपोलीहून १३.४८ वाजता सुटणारी लोकल कर्जतहून १४.१४  वाजता सुटेल.

Web Title: Special traffic-power block for Karjat yard improvement