Join us

हार्बर मार्गावर आज रात्री विशेष ब्लॉक; परिणाम काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 06:49 IST

ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कुर्ला येथे पादचारी पुलाच्या प्लेट गर्डर्स लाँच करण्यासाठी शनिवारी रात्री ११.५०  ते रविवारी पहाटे ४.३० पर्यंत अप जलद मार्गावर विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द या मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वे १४० टी रेल्वे क्रेन वापरून कुर्ला स्थानकावर ८ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रीजचे पाच प्लेट गर्डर सुरू करण्यासाठी अप जलद मार्गावर आणि डाऊन हार्बर मार्गावर रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत.

परिणाम काय?

डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल पनवेल ही सीएसएमटीवरून रात्री ११.१४ वाजता सुटेल. अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल पनवेल लोकल वडाळा रोडवरून रात्री ११.८ वाजता सुटेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :हार्बर रेल्वेमध्य रेल्वे