मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:30 IST2025-01-17T05:27:01+5:302025-01-17T05:30:07+5:30

शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोलीदरम्यान, तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत  नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत. 

Special block on Central Railway today and Sunday | मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक 

मध्य रेल्वेवर आज आणि रविवारी विशेष ब्लॉक 

मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोलीदरम्यान, तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत  नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत. 

शुक्रवार, १७ जानेवारी रोजी दुपारी १:५० ते ३:३५ या दरम्यान ब्लॉक असेल.  पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाइन तसेच  कर्जत (कर्जत प्लॅटफार्म ३ च्या पनवेल दिशेकडे क्रॉसओवरसह) ते चौक, भिवपुरी स्टेशन (क्रॉसओवर वगळून) अप आणि डाउन लाइन दरम्यान हा ब्लॉक राहणार आहे.

१९ जानेवारी  रोजी दुपारी ११.२० ते १:०५ दरम्यान ब्लॉक असणार आहे. पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाइन तसेच कर्जत (क्रॉसओव्हरसह) ते चौक, भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) अप आणि डाउन लाइनवर ब्लॉॅक आहे.

Web Title: Special block on Central Railway today and Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.