मध्य रेल्वे चालविणार विशेष वातानुकूलित गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 03:41 IST2020-10-10T03:40:50+5:302020-10-10T03:41:03+5:30
लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार वातानुकूलित द्वि-साप्ताहिक विशेष १५ आॅक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार व गुरुवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हरिद्वारला पोहोचेल, तर हरिद्वार येथून ती १६ आॅक्टोबरपासून दर मंगळवार व शुक्रवारी सुटेल.

मध्य रेल्वे चालविणार विशेष वातानुकूलित गाड्या
मुंबई : मध्य रेल्वे १५ आॅक्टोबरपासून ३ वातानुकूलित विशेष गाड्या चालविणार आहे. त्या पूर्णपणे आरक्षित असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस-हरिद्वार वातानुकूलित द्वि-साप्ताहिक विशेष १५ आॅक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार व गुरुवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हरिद्वारला पोहोचेल, तर हरिद्वार येथून ती १६ आॅक्टोबरपासून दर मंगळवार व शुक्रवारी सुटेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनौ वातानुकूलित साप्ताहिक विशेष १८ आॅक्टोबरपासून दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. लखनऊ येथून ती १८ आॅक्टोबरपासून दर रविवारी सुटेल. नागपूर-अमृतसर वातानुकूलित साप्ताहिक विशेष १७ आॅक्टोबरपासून दर शनिवारी नागपूरहून सुटेल. अमृतसरवरून ती १९ आॅक्टोबरपासून दर सोमवारी सुटेल.
या सर्व वातानुकूलित एक्स्प्रेसचे थांबे आणि वेळ नियमित वातानुकूलित एक्स्प्रेसप्रमाणेच असेल.