बाहेर चमचमीत जेवण, आत घाण! २२ हाॅटेल्सचे शटर डाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 02:58 PM2023-11-22T14:58:29+5:302023-11-22T14:58:57+5:30

चमचमीत जवेण, उत्तम बैठक व्यवस्था मात्र आतमध्ये अस्वच्छता असलेल्या २२ हॉटेल्सचे शटर डाऊन करण्यात आले आहे.

Sparkling food outside dirt inside 22 hotels shutter down | बाहेर चमचमीत जेवण, आत घाण! २२ हाॅटेल्सचे शटर डाऊन

बाहेर चमचमीत जेवण, आत घाण! २२ हाॅटेल्सचे शटर डाऊन

मुंबई : चमचमीत जवेण, उत्तम बैठक व्यवस्था मात्र आतमध्ये अस्वच्छता असलेल्या २२ हॉटेल्सचे शटर डाऊन करण्यात आले आहे. हाॅटेल्समध्ये अन्न सुरक्षेबाबतच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेत अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

गेल्या २ महिन्यात शहर उपनगरातील छोट्या - मोठ्या अशा तब्बल २०० हाॅटेल्समध्ये केलेल्या कारवायांमध्ये अन्न सुरक्षेबाबतच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या हॉटेल्सपैकी २२ हॉटेलचे शटर डाऊन करण्यात आले आहे.

हाॅटेल्सच्या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या १०० नियमांपैकी किमान ९० नियम पाळावे लागतात. मात्र, या तपासणीत अनेक हाॅटेल्स मूलभूत नियमही पाळत नसल्याचे समोर आले आहे. 

सुधारणा न केल्यास दंडात्मक कारवाई
या कारवायांदरम्यान मुंबईतील दोन हाॅटेल्सना नोटीस बजावूनही वेळेत सुधारणा न केल्याने दंड लावण्यात आला आहे. त्यात सुमारे ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सदोष हाॅटेल्सच्या व्यवस्थापकांना सुधारणा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येते. त्यानंतर पुन्हा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येते. मात्र, दिलेल्या मुदतीतही हाॅटेल्सने पूर्तता अहवाल न पाठविल्यास त्यांच्यावर कारवाई होते.
- शैलेश आढाव, सहआयुक्त

Web Title: Sparkling food outside dirt inside 22 hotels shutter down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.