Join us

निवृत्त होताच सीताराम कुंटे झाले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार, मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देबाशिष चक्रवर्तींकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:16 IST

Sitaram Kunte News: अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे मंगळवारी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर लगेच त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.

 मुंबई : अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे मंगळवारी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर लगेच त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.सीताराम कुंटे यांना किमान तीन महिने मुदतवाढ दिली जाईल, अशी चर्चा होती. कुंटे यांना तीन महिने मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. ती केंद्राने ती अमान्य केली. मात्र, १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले चक्रवर्ती यांना मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांनाच पूर्णवेळ मुख्य सचिवपद दिले जाईल की त्यांच्या जागी नवीन मुख्य सचिव नेमण्यात येतील, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घेतील, असे सूत्रांनी सांगितले. देबाशिष चक्रवर्ती आणखी तीन महिन्यांनी, फेब्रुवारीअखेरीस निवृत्त होणार आहेत.कुंटे यांना मुख्य सचिवपदी मुदतवाढ देण्यात आली नसली तरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागारपदी नियुक्ती केली. यापूर्वी अजोय मेहता हे मुख्य सचिवपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागारपदी करण्यात आली होती.

टॅग्स :महाराष्ट्र सरकार