Join us  

निवडणुका जाहीर होताच वैद्यनाथमधील कर्मचाऱ्यांची पगार बँकेत जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:46 AM

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याती कर्मचाऱ्यांचे गेल्या 13 महिन्यांपासूनचे वेतन रखडले होते.

मुंबई - राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री यांनी निवडणुकांची तारीख जाहीर होतात वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा सर्व थकित पगार दिला आहे. त्यानंतर, कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी गोपीनाथ गडावर प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले. पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. त्यावेळी, सप्टेंबर महिन्यात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले आहे. मात्र, गेल्या 13 महिन्यांपासून येथील कर्मचाऱ्यांचा पगार रखडला होता. 

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याती कर्मचाऱ्यांचे गेल्या 13 महिन्यांपासूनचे वेतन रखडले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे परळी विधानसभेचे उमेदवार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपोषणातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन शासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी केली होती. ''मागील १३ महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. १८ महिन्यांपासून पी एफ मिळाला नाही तसेच या कर्मचाऱ्यांच्या इतरही रास्त मागण्या आहे. पण शासन या कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे.'', असे ट्विट मुंडेंनी केले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कर्मचाऱ्यांचे पैसे बँकेत जमा करण्यात आले आहेत.  

दरम्यान, उपोषण करणारे कर्मचारी हे राष्ट्रवादीचे समर्थक असून जाणीपूर्वक हे उपोषण करण्यात आल्याचे पंकजा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यापूर्वीच तुमची देणी दिली जातील, असे पंकजा यांनी सांगितले होते, तरीही हा उपोषणाचा घाट घालण्याचा आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, यातील काही लोकांचे कारखान्याकडे देणे आहे, शिवाय बहुतेक लोक राष्ट्रवादीचे बुथ प्रमुख आहेत. सर्व कर्मचारी एकीकडे आणि 25-30 कर्मचारी उपोषणात असे चित्र होते. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपले उपोषणाला समर्थन नाही असे लेखी दिले आहे तरीही काहीजण राजकीय दबावापोटी उपोषणाला बसले असल्याचे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :पंकजा मुंडेधनंजय मुंडेमुंबईबँकबीड