Join us

महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 23:12 IST

यावेळी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उत्तर मध्य मुंबईत महायुतीचे भाजपा उमेदवार ऍड. उज्वल निकम यांनी प्रचारात जोर धरला आहे. अशात त्याच्या प्रचारासाठी त्याचे चिरंजीव अनिकेत निकम हे सुद्धा निवडणूक रणसंग्रामात उतरले आहेत. त्यांनी रविवारी खार- वांद्रे परिसरात घरोघरी जाऊन आपल्या वडिलांचा प्रचार केला.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने उत्तर मध्य मुंबईत महायुतीकडून प्रचाराचे विशेष नियोजन करण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून वांद्रे शिंदे सेनेचे विभागप्रमुख कृणाल सरमळकर यांच्यासमवेत ऍड.उज्वल निकम यांचे चिरंजीव अनिकेत निकम यांनी वांद्रे खेरवाडी भोमीया मंदिर, पालिका आणि शिवाजीनगर, खेरनगर साईबाबा मंदिर मंदिर भेट, शाखा क्र. ९६, बेहरामपाडान शाखा क्र.१२, भारतनगर संत ज्ञानेश्वर नगर येथे स्थानिक मंडळ आणि मतदारांच्या घरोघरी जाऊन निमक यांचा प्रचार केला. यावेळी मोठ्या संख्येने शिंदे सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४उज्ज्वल निकममुंबई उत्तर मध्यमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४