Join us

'राजहट्ट अन् बालहट्टासाठीच मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडची जागा बदलली'

By महेश गलांडे | Updated: December 22, 2020 09:02 IST

कांजूरमार्ग येथे प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला 4 वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय.

ठळक मुद्देकांजूरमार्ग येथे प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला 4 वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियोजित वेळेनुसार रविवारी दुपारी 1 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग याबाबतही सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न केले आहेत. तसेच भाजपाच्या इतर नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर टीका केली. आता, माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. तसेच, केवळ राजहट्ट आणि बालहट्टासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचंही ते म्हणाले.  

कांजूरमार्ग येथे प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला 4 वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. कांजूरमार्गची जागा न्यायालयीन वादात आहे, त्यामुळे ठाकरे सरकारच्या समितीनेच दिलेल्या अहवालातून स्पष्ट सांगण्यात आले आहे की, मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलविल्यास 4 वर्षांचा विलंब होईल. तरीही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ बालहट्ट आणि राजहट्टासाठी हा प्रकल्प कांजूरमार्गला हलविण्याचे आदेश दिले आहेत.

  

अहवाल सार्वजनिक करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचं होणारं नुकसान सांगत उद्धव ठाकरेंना अहंकारी असं संबोधलं होतं. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे फडणवीसांच्या अहंकारी टीकेला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर, फडणवीस यांनी पुन्हा एकदा ही श्रेयवादाची लढाई नसून लोकांची दिशाभूल कशाला करता? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा प्रश्न फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच, 30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरीसुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असेही फडणवीस यांनी सांगितले होते. 

शरद पवार प्रॅक्टीकल

या मेट्रो प्रकल्पात आम्ही भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत, मेट्रो होऊ नये असं कोणाचंच मत नाही. मी स्वत: मेहनत करुन 80 टक्के टनलिंगचं काम त्या काळात पूर्ण केलंय. त्यामुळेच पवारसाहेब जर मोदींशी बोलून यासंदर्भात चर्चा करणार असतील, तर त्यांचं स्वागतच आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी चर्चा करावी. हे पहा, शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, पवारसाहेब जेव्हा तो अहवाल वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :मेट्रोउद्धव ठाकरेकिरीट सोमय्यामुंबई