Join us
Daily Top 2Weekly Top 5

गॅस तुटवड्यावर उतारा; राज्यात ३७ लाख लिटर केरोसीनचे होणार वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:24 IST

प्रत्येक कुटुंबाला महिन्याला मिळणार ३ लिटर रॉकेल 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात एलपीजी (गॅस) तुटवडा जाणवत असल्याने महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत तात्पुरत्या स्वरूपात केरोसीन वितरणास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारकडून राज्यासाठी ३,७४४ किलोलीटर (३७.४४ लाख लिटर) केरोसीन मंजूर करण्यात आले असून, प्रत्येक कुटुंबाला ३ लिटरपर्यंत केरोसीन देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मार्च २०२६ पासून या वितरणाची अंमलबजावणी होणार आहे.

नागपूर खंडपीठाने २०१६ मध्ये एलपीजी कनेक्शन असलेल्या कुटुंबांना केरोसीन देऊ नये, असा आदेश दिला होता. त्यामुळे वितरण अत्यंत मर्यादित झाले होते. मात्र, आखाती युद्धामुळे एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्याने हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.

कोणाला मिळणार? अंत्योदय आणि प्राधान्य शिधापत्रिका धारकांना प्रथम प्राधान्य.

उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारकांनाही लाभ.

शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनाही (ग्रामपंचायत दाखल्यावर) केरोसीन मिळणार. स्थलांतरित मजूरदेखील पात्र ठरणार.

वितरणाची अट, कालावधी प्रत्येक कुटुंबाला ३ लिटर केरोसीन. ४५ दिवसांत संपूर्ण उचल बंधनकारक. न उचललेला साठा पुढे नेला जाणार नाही.

दर अद्याप निश्चित नाही

केरोसीनचे वाहतूक दर आणि विक्रेत्यांच्या कमिशनबाबत निर्णय प्रलंबित असून, दराबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.

तेल कंपन्यांना कठोर सूचना

सरकारने इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांना निर्देश दिले आहेत८५ टक्के साठा पहिल्या १५ दिवसांत वितरित करणे.उर्वरित साठा पुढील १५ दिवसांत देणे.जिल्हानिहाय वाटप काटेकोरपणे पाळणे. विलंब करू नये

जिल्हानिहाय वाटप

ग्रामीण भागाला प्राधान्य देत केरोसीन वाटप करण्यात आले आहे. नाशिक (२२८ किलो लीटर), पुणे ग्रामीण (२०४ किलो लीटर), छत्रपती संभाजी नगर (२१६ किलो लीटर) यांसारख्या जिल्ह्यांना अधिक प्रमाणात साठा देण्यात आला आहे. शहरी भागातील काही जिल्ह्यांना (मुंबई, पुणे शहर, नागपूर शहर) साठा देण्यात आलेला नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kerosene Relief: Maharashtra to Distribute 3.7 Million Liters Amid Gas Shortage

Web Summary : Maharashtra approves kerosene distribution due to LPG shortages. 3.7 million liters are allocated prioritizing families with ration cards and migrants. Each family gets 3 liters, distribution within 45 days. Rural areas get priority. Prices are pending.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईगॅस सिलेंडर