सोसायटीच्या सचिवाची महिलेबाबत अश्लील भाषा; सदस्यांना पाठवला ई-मेल; बदनामीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:47 IST2025-10-12T11:46:53+5:302025-10-12T11:47:41+5:30
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी सोसायटीच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून त्यांना आणि इतर १६ कमिटी मेंबर्स व एका स्वतंत्र संचालकासह एका ई-मेलमध्ये विनोद वर्मा यांनी अश्लील आणि अपमानास्पद मजकूर पाठवला. यामध्ये तक्रारदाराच्या पत्नीबाबत अश्लील, बदनामीकारक वक्तव्य केले. विनोद वर्मा हे गेल्या तीन वर्षांपासून सोसायटीचे सेक्रेटरी आहेत.

सोसायटीच्या सचिवाची महिलेबाबत अश्लील भाषा; सदस्यांना पाठवला ई-मेल; बदनामीचा गुन्हा दाखल
मुंबई : कांदिवली पूर्वेतील एका नामांकित सोसायटीच्या सचिवाने महिला सदस्याबाबत अश्लील टिप्पणी करत ई-मेल सोसायटीच्या सदस्यांना पाठवून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सचिव विनोद वर्मा विरुद्ध शुक्रवारी समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी सोसायटीच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून त्यांना आणि इतर १६ कमिटी मेंबर्स व एका स्वतंत्र संचालकासह एका ई-मेलमध्ये विनोद वर्मा यांनी अश्लील आणि अपमानास्पद मजकूर पाठवला. यामध्ये तक्रारदाराच्या पत्नीबाबत अश्लील, बदनामीकारक वक्तव्य केले. विनोद वर्मा हे गेल्या तीन वर्षांपासून सोसायटीचे सेक्रेटरी आहेत.
यापूर्वीही २०२३ साली अशाच स्वरूपाचा विनयभंगाचा आरोप त्याच्यावर एका अन्य महिला सदस्याने केला होता, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. नुकत्याच घडलेल्या प्रकारात, तक्रारदार तसेच त्यांच्या पत्नीविषयी अश्लील, अपमानास्पद शब्दांचा वापर ४०० सदस्य असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप आणि ई-मेलवर केल्याचेही म्हटले आहे.