Join us

घर भाड्याने देणे, विकणे यासाठी आता सोसायटीच्या NOC ची गरज नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 05:25 IST

घरमालकाला स्वत:चा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे, हा त्याचा निर्णय आहे.

मुंबई :  

घरमालकाला स्वत:चा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे, हा त्याचा निर्णय आहे. जर एखाद्या घरमालकाला घर विकायचे असेल तर त्यासाठी सोसायटीची परवानगी कशासाठी? घरमालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. आव्हाड यांच्या घोषणेमुळे आता फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीच्या परवानगीची प्रथा मोडीत निघणार आहे. एखाद्या घरमालकाने त्याची थकबाकी बाकी नाही, हे एनओसी पत्र काढून घ्यावे, असेही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :जितेंद्र आव्हाड