Join us
Daily Top 2Weekly Top 5

..तर विराट कोहली ‘ऑरेंज कॅप’ जिंकू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 05:16 IST

२०१६ च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीने धडाकेबाज कामगिरी केली होती

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली या हंगामात ऑरेंज कॅप नक्की मिळवेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी  व्यक्त केला. आयपीएलमध्ये यंदा दोन संघ वाढले असल्यामुळे प्रत्येक सामन्यात चुरस पाहायला मिळत आहे. काही संघांना नवे कर्णधार मिळाल्यामुळे फलंदाजी तसेच गोलंदाजीमध्ये मोठे बदल झालेले दिसतात.

२०१६ च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्याने फलंदाजीसाठी सलामीला येत पूर्ण हंगामात एकूण ९७३ धावा केल्या होत्या. त्यावर्षी त्याने ‘ऑरेंज कॅप’ पटकाविली होती. कदाचित याच कारणामुळे रवी शास्त्री यांनी विराटला सलामीला येण्याची संधी दिली, तर तो नक्की ऑरेंज कॅप मिळवेल, असे भाकीत केले आहे. दरम्यान, बंगळुरू आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीने दिलेल्या २०६ धावांचे लक्ष्य दिल्लीने लिलया पेलले. या सामन्यातही विराटने चांगली कामगिरी केली होती.

कोहली या हंगामात आरसीबीचा सलामीवर म्हणून मैदानात उतरला, तर तो नक्की ऑरेंज कॅप पटकावेल, असे रवी शास्त्री यांनी  म्हटले.   कोहलीला सलामीला येण्याची संधी दिली जाईल का ? याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. ‘कोहलीला सलामीला फलंदाजीसाठी पाठविले जाईल की तो तिसऱ्या क्रमांकावर येईल, हे सर्व संघाच्या संतुलनावर अवलंबून असेल.  मधल्या फळीमध्ये चांगले फलंदाज असतील तर विराटला सलामीला येण्याची संधी दिली जाऊ शकते,’असे शास्त्री म्हणाले.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२२