...तर नववर्षात मध्य रेल्वेवर वाढतील ६० फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:45 AM2020-01-01T05:45:16+5:302020-01-01T06:42:38+5:30

ठाणे-दिवा मार्गिका पूर्ण होण्याची शक्यता; प्रवाशांच्या सोयीसह वक्तशीरपणा वाढणे अपेक्षित

... so in the New Year there will be 2 rounds on the Central Railway | ...तर नववर्षात मध्य रेल्वेवर वाढतील ६० फेऱ्या

...तर नववर्षात मध्य रेल्वेवर वाढतील ६० फेऱ्या

Next

- कुलदीप घायवट 

मुंबई : नव्या वर्षात मध्य रेल्वे मार्गावरील अनेक वर्षांपासून रखडलेली ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी साधारण ५० ते ६० लोकल फेऱ्या वाढतील. यासह मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ठाणे-दिवा मार्गिका झाल्यामुळे वाढेल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाला आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) यांच्याद्वारे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. एमयूटीपी २ मधील ठाणे-दिवा पाचवी, सहावी मार्गिका २०२० मध्ये पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे ध्येय आहे. या मार्गिकेमुळे एक्स्प्रेससाठीचा मार्ग खुला होईल, तर उर्वरित चार मार्गिका लोकलसाठी वापरल्या जातीाल. त्यामुळे या मार्गावरून जादा फेºया चालविण्यावर भर दिला जाईल.

पावसाळ्याआधी ७० टक्के काम पूर्ण करणार - एमआरव्हीसी
ठाणे-दिवा या मार्गातील यार्डचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येतील. ब्लॉॅक कधी आणि कोणत्या वेळेत घेतले जावेत, यावर नियोजन सुरू आहे. एमआरव्हीसीचे ७० टक्के काम पावसाळ्याआधी पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर, मध्य रेल्वेद्वारे उर्वरित काम केले जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे-दिवा प्रकल्पाचे काम नव्या वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाचवी आणि सहावी मार्गिका तयार झाल्यास मध्य रेल्वे मार्गावर ५० ते ६० फेºया वाढविण्यात येतील. यासह मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा वाढविण्यासाठी भर दिला जाईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: ... so in the New Year there will be 2 rounds on the Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.