Join us

मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप, परिसरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 14:51 IST

Mumbai High Court : सापाला रेस्क्यू करण्यात यश आल्यानंतर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप आढळून आला. न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सापाला रेस्क्यू करण्यात यश आल्यानंतर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालायत न्यायाधीश बोरकर यांच्या चेंबरमध्ये शुक्रवारी सकाळी साप आल्याचे दिसून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर सर्पमित्रांच्या मदतीने साप पकडण्यात आला. त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टॅग्स :मुंबई हायकोर्टसाप